shirdi , section 144 imposed in ahmednagar saam tv
महाराष्ट्र

Shirdi Breaking News : शिर्डीत रेड अलर्ट; पाेलिस दल सतर्क

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने काही उपाययाेजना राबविल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

Red Alert In Shirdi : नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लागू केले आहे. शिर्डी येथील सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पाेलिस (police) प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाच्या वतीने काही ठाेस पावलं तातडीनं उचलली गेली आहेत. त्याची माहिती एसपी मनाेज पाटील यांनी साम टीव्हीला दिली.

शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी हॉटेल व्यवसायिकांसह ग्रामस्थांच्या बैठकीत ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रूम (room) दिल्यास कडक कारवाई करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. त्याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी साम टीव्हीला दिली.

पाटील म्हणाले जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर 188 कलमानूसार कारवाई केली जाईल. तसेच सिम कार्ड विक्रेत्यांनी देखील याेग्य कागदपत्रांशिवाय सिम कार्ड वितरीत केले गेले तर त्यांच्यावर कठाेर कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून काही संशायस्पद आढळल्यास अथवा वाटल्यास पाेलिस ठाण्यात कळवावे असे आवाहन पाेलीस दलानं केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील बड्या उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

SCROLL FOR NEXT