Latur Breaking News Saam Digital
महाराष्ट्र

Latur Breaking News: शालेय कार्यक्रमातील आसनव्यवस्था कोसळली, ४० हून अधिक विद्यार्थी जखमी

Latur Breaking News: लातूर जिल्ह्यातील आलमला येथील शालेय कार्यक्रमातील आसनव्यवस्था कोसळून 40 हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार होता.

Sandeep Gawade

Latur Breaking News

लातूर जिल्ह्यातील आलमला येथील शालेय कार्यक्रमातील आसन व्यवस्था कोसळून 40 हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार होता. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या शिक्षण प्रसारक मंडळच्या प्रांगणात औसा तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र कॅबिनेट मंत्री येताच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेले लाकडी आसन कोसळले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमाला विद्यार्थ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लाकडी आसनव्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार होता. त्याचवेळी विद्यार्थीच्या संख्या वाढली आणि लाकडी आसनव्यवस्था कोसळून पडली आहे. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.यात एकूण 40 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT