महायुती  Saam Tv
महाराष्ट्र

Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?

Seat-Sharing Talks Begin in Mahayuti : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत भाजप तर ठाण्यात शिंदे गटाची शिवसेना आघाडीवर राहणार असल्याचे समजते आहे.

Namdeo Kumbhar

Mahayuti Local Body News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल काही दिवसांत वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. बीएमसीमध्ये भाजप मोठा भाऊ असेल तर ठाण्यात शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ ठरणार असल्याचे समजतेय. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरू केली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात याबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपला ज्या ठिकाणी आपली ताकद जास्त आहे, तिथे स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे सांगितल्याचे समोर आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. बीएमसीच्या निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे कमी आहेत. त्यामुळे बीएमसीच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असेल, तर शिवसेना लहान भाऊ असेल. भाजपने याआधीच मुंबईमध्ये १५० चा नारा दिला आहे. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेच ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथे भाजप लहान भाऊ असेल, असे समजतेय.

सर्वोच्च न्यायालयाने चार ते पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील नेत्यांकडून तयारी सुरू करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. मुंबईत भाजप मोठा भाऊ, शिवसेना लहान भाऊ असणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार आहे.

मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार आहे. मुंबईत भाजपने 150 प्लसचा नारा आधीच दिला आहे. तर सध्या स्थितीत शिंदेच्या शिवसेनेकडे 40 च्या आसपास माजी नगरसेवक आले आहेत.

शिवसेनेची स्थिती पाहता भाजपपेक्षा कमी जागा घ्यावी लागणार आहे. तसेच ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार आहे. नाशिक महानगरपालिका मध्ये भाजप जास्त जागा घेणार तर पुण्यात राष्ट्रवादी जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर याठिकाणी शिवसेनेला जास्त जागा मिळू शकतात, असेही समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT