Maha Vikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कन्फर्म! लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरली

Maha Vikas Aghadi: राज्यातील महाविकास आघाडी, म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रणजीत माझगावकर

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing Formula:

येत्या दोन महिन्यात देशात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. यासाठी आतापासूनच सगळे पक्ष कामाला लागले आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडी, म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप 10 तारखेला निश्चित होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधी शुक्रवारी मुंबईतील ट्रायडंट हॅाटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठिकाला महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ही उपस्थित होते. (Latest Marathi News)

इंडिया आघाडीत सामील करुन घ्या, याबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जाहीरपणे भूमिका मांडली होती. त्याअनुषंगाने आता महाविकास आघाडीत देखील अधिकृतपणे आंबेडकरांची एंट्री झाली आहे. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच आपल्या टीमसोबत बैठकीसाठी ट्रायडंट येथे हजर राहिले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ''प्रकाश आंबेडकर हे आज (शुक्रवारी) बैठकीत सामील झाले. पुढची दिशा ठरली असून सकारात्मक चर्चा झाली. भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असं काहीही करायचं नाही.''

ते म्हणाले, देशातील वातावरण बदलण्सासाठी आम्ही एकत्र राहणार. भाजपाचा पराभव ही आमची प्राथमिकता असून त्यानंतर जागावाटप. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT