Maharashtra Weather Forecast Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: उकाड्यामुळे अंगाची लाही लाही, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणखी तापणार; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather Forecast: राज्यात तापमान पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहचला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.

Priya More

राज्यात पुन्हा तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसानंतर आता राज्यातील कमाल तापमानात वाढ व्हायला सुरूवात झाली असून उन्हाचे चटके पुन्हा जाणवून लागले आहेत. राज्यात आजही सूर्य आग ओकणार आहे. आजही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात सगळीकडेच उष्ण आणि आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसंच, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, सांगली, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, शुक्रवारी अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. तर जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती आणि वाशीम या ठिकाणी ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता ४० अंश सेल्सिअसच्या वर पुण्यातील तापमान होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT