Solapur Girl Missing saam tv
महाराष्ट्र

Solapur Girl Missing : माळशिरसमध्ये पहिलीत शिकणारी मुलगी शाळेतून गायब; पालकांमध्ये खळखळ

Solapur Crime News : मुलगी गायब झाल्यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यात शाळेच्या वतीने सोमनाथ पांडुरंग सगर यांनी फिर्याद दिली आहे.

भरत नागणे

Solapur News : सोलापुरात पहिलीच्या वर्गात शिकणारी ६ वर्षाची एक मुलगी शाळेतून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील शाळेत २ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. यामुळे पालकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आदिती गणेश चौगुले असं बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.

मुलगी गायब झाल्यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यात शाळेच्या वतीने सोमनाथ पांडुरंग सगर यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिती खंडाळी येथील भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकते. 2 ऑगस्ट रोजी ती सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. (Latest News Update)

दुपारच्या सुट्टीमध्ये आदितीने तिच्या मैत्रींसोबत जेवण केले. जेवणानंतर घरी जाऊन येते असं सांगून ती गेली होती. त्यानंतर आदिती शाळेत परत आलीच नाही. आदितीच्या शिक्षकांनी व तिच्या घरच्यांनी शोध घेतला असता ती अद्याप सापडलेली नाही. (Maharashtra News)

या प्रकरणी शाळेतील शिक्षक सोमनाथ पांडुरंग सगर यांनी आदिती चौगुले हिला कोणीतरी अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वेळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आदितीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे खंडाळी व वेळापूर परिसरातील पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT