Latur Accident News, Latur Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Latur: लातुरात स्कूल बस उलटली; सुदैवाने सात विद्यार्थी बचावले

वाहन चालक हा प्रचंड दारूच्या नशेत होता. पोलिसांची कडक कारवाईचे संकेत

दीपक क्षीरसागर

लातूर - काल शाळा सुटल्यानंतर एक स्कूल बस पलटी झाली. यात असलेल्या सात विद्यार्थी सुदैवाने बचावले आहेत. कोणता ही विद्यार्थी जखमी झाला नाही. ड्रीमलॅन्ड इंग्लिश स्कूलच्या स्कूल बस नेहमी प्रमाणे विद्यार्थी घरी सोडत होती. वाहन चालक विशाल पवार हा प्रचंड दारूच्या नशेत होता. स्कूल बस (School Bus) डी मार्ट भागातील रिग रोड परिसरात आली असता वाहन चालकाचा तोल गेला. स्कूल बस ही बाजूच्या नाल्यात पलटी झाली. यावेळी बस (Bus) मध्ये सात विद्यार्थी होते. (Latur Latest Marathi News)

हे देखील पाहा -

यातील कोणत्याही विद्यार्थ्यस मार लागला नाही. घटना पाहिल्या नंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली विदयार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. वाहन चालकास लोकांनी पकडले त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. शिवाजी नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. वाहन चालक विशाल पवार यास ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी साठी वाहन चालक यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहे.

हा सर्व प्रकार मोबाइल कॅमेर्यात कैद झाला आहे. वाहन चालक दारू पिल्याचे कबूल करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्यास चांगलेच धारेवर धरले होते. शाळा प्रशासनाने ही स्कूल बस सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि वाहन चालकांची योग्य विचारपूस करून काम द्यावे. नाहीतर अश्या धोकादायक घटना घडू शकतात या बाबत सतर्क राहावे असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT