Sawantwadi News Saam Digital
महाराष्ट्र

Sawantwadi News : सावंतवाडीत त्या घटनेची अमेरिकेनेही घेतली गंभीर दखल; घनदाट जंगलात विदेशी महिलेसोबत काय काय घडलं? सविस्तर वाचा थरारक प्रसंग

Sindhudurg News : सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावानजीक घनदाट जंगलात एका अमेरिकन महिलेला ३ दिवस बांधून ठेवण्यात आलं होतं. या घटनेची अमेरिकेच्या दुतावासाने गंभीर दखल घेतली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावानजीक एक धक्कादायक घटना समोर आली होती. सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीच्या घनदाट जंगलात विदेशी महिलेला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. दोन तीन दिवस बांधून ठेवल्यामुळे तीची प्रकृतीही खालावली आहे. स्थानिकांमुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महिलेची सुटका केली होती. दरम्यान या घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासाने घेतली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीचा पती भारतीय असून त्याला ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान पोलीसांसमोर आहे.

महिलेजवळ मोबाईल, टॅब आणि ३१ हजार रुपये रोख सापडले आहेत. सध्या या महिलेवर गोवा बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ललिता कायी कुमार एस असं या अमेरिकन महिलेचं नाव आहे. या घटनेची घडलेल्या या अमानवी घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासाने घेतली आहे. त्या महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलीस ठाण्यात कलम-109, 125, 127-2, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सतीश भारतीय असल्याची माहिती आहे.

सावंतवाडी रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने या महिलेला बांधून ठेवण्यात आलं होतं. याची सर्व माहिती कुठे व कोणत्या परिस्थितीत बांधून ठेवण्यात आले होते याची प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी माहीती दिली आहे 27 जुलै दिवशी हा प्रकार उजेडात आला होता. मात्र दोन दिवस अगोदरच त्या महीलेचा रोणापाल जंगलात आवाज येत होता मात्र वादळी वारे व पावसामुळे जंगलात जाता आले नाही मात्र 27 जुलै रोजी एक गुराखी त्याठिकाणी गेला तेव्हा त्या महिलेला साखळदंडाने एका झाडाला बांधून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगीतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT