Sparrow SaamTVNews
महाराष्ट्र

पर्यावरण संतुलनासाठी चिमण्यांची जोपासना करा; पक्षीमित्र धनंजय गुट्टे याचं आवाहन

सध्याच्या हवामान बदलाच्या काळात वन्यप्राणी तसेच पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : आज जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा केला जातो पण सध्याच्या प्रदूषित वातावरणात चिमण्यांचा आदिवास नष्ट होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडत असून चिमण्यांना वाचवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन पक्षीमित्र तथा पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुट्टे यांनी केले आहे.

हे देखील पहा :

सध्याच्या हवामान बदलाच्या काळात वन्यप्राणी तसेच पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चिमण्या अथवा पक्षी शेतकऱ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. किडरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षी मोठी मदत करत असतात. पण, नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याने चिमण्यांना अन्न मिळणं कठीण झाले आहे.

आता उन्हाळा सुरू झाला असून वातावरणातली दाहकता चिमण्यांना मुश्कील ठरत आहे. यासाठी नागरिकांनी चिमणी असो की अन्य पक्षी यांना अन्न आणि पाण्याची सोय करावी जेणेकरून चिमण्या जीवंत राहिल्या तर पर्यावरणाच संतुलन साधून त्याचा मानव जातीला फायदा नक्कीच होणार असल्याचे मत पक्षीमित्र तथा पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुट्टे यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

SCROLL FOR NEXT