Satyajeet Tambe Saam Tv
महाराष्ट्र

Satyajeet Tambe News: अखेर सत्यजित तांबे यांनी मौन सोडलं, म्हणाले, योग्य वेळी...,

सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik Graduate Constituency Election News : सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. पण या सर्व चर्चांवर खुद्द सत्यजित तांबे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांची शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्यासोबत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले सत्यजित तांबे?

"ज्यावेळी आमच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले, त्यावेळी स्वतःहून आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल कपिल पाटील यांचे आभार व्यक्त करतो. विद्यार्थी संघटनेत मी कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम केलं" असं सत्यजित तांबेव म्हणाले.

"युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष असताना मी गेल्या 22 वर्षात चांद्यापासून बांद्यापर्यंत मित्र जमा करण्याचं करण्याच काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणुन कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते”, अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.

"राज्यात किती राजकारण होतं हे मागच्या चार-पाच दिवसात आपण सगळ्यांनी पाहिलच असेल. खूप राजकारण झालंय त्या विषयावर आम्ही योग्य वेळी योग्य रितीने बोलू. आता सध्या राजकारणावर बोलणार नाही”, अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी मांडली.

"डॉ. तांबे यांनी मागील १४-१५ वर्षात अनेक काम केलंय, ते अधिक ताकदीने पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन. मुळातच मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. वेळप्रसंगी प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतःच्या सरकार विरोधात देखील आंदोलन केलय. वडिलांना जशी ताकद दिली तसेच ताकद माझ्यामागे उभी करावी असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

SCROLL FOR NEXT