Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Satej Patil: कोल्हापुरातून सत्तांतराचं बीज पेरलं गेलंय, २०२९ मध्ये महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार; सतेज पाटलांचा सरकाराला इशारा

Maharashtra Politics: गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्ती आणि चार शासन नियुक्त संचालकांच्या मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Surabhi Jayashree Jagdish

गोकुळच्या निवडणुकीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्यास विरोध करूनही सरकारने प्रशासक नेमला. त्यानंतर आता शासनाकडून चार संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

त्याचप्रमाणे २०२९ मध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून होणार असल्याचा निर्धार सतेज पाटील यांनी केला. कोल्हापुरातून महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाचं बीज पेरलं गेलंय, असं सतेज पाटील म्हणालेत. संघर्षमोर्चानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत ते बोलत होते.

गोकुळची निवडणूक सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. गोकुळवर प्रशासक आणू नका, असं आवाहन आम्ही केलं होतं. पण दुर्दैवाने सरकारने गोकुळवर प्रशासक नियुक्त केला. राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असून सहकार कायदा पायदळी तुडवला जात आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालकांची नियुक्ती करून सरकारने हे दाखवून दिलं आहे. सहकार क्षेत्र मोडून काढण्याचं काम सरकार करत आहे, असं सतेज पाटील म्हणाले.

मी समोर येऊन लढतो, तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसत नाही

गोकुळसाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढलो. पण त्यावेळी सत्तेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी यावर काहीच भूमिका घेतली नाही. एकीकडे मोठ्या नेत्यांची फौज होती, तर दुसरीकडे राजू शेट्टी, गणपतराव पाटील आणि सत्यजीत पाटील यांनी संघर्षाच्या काळात मला साथ दिली. तुम्ही मला सोडून गेलात म्हणून मी घाबरणारा नाही, असं सतेज पाटील म्हणाले.

मी समोर येऊन लढतो, तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मी शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तुम्ही मुलासाठी लढत होता

गोकुळच्या लढाईवर बोलताना सतेज पाटील यांनी विरोधकांवरही टीका केली. मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलो होतो तर तुम्ही तुमच्या पोराबाळांसाठी निवडणूक लढवत होता. गोकुळसाठी मी पायाला भिंगरी लावून फिरलो. मी कधीही जातीवाद केला नाही. पण तुमचा मुलगा निवडणुकीत पडला म्हणून तुम्ही चार वेळा त्याचा उल्लेख केला. मग इतर जातींचे उमेदवार पडले, त्याबद्दल तुम्ही का बोलला नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यामुळेच शासन नियुक्त संचालकांची संख्या वाढली आहे. हे त्यांचंच पाप आहे, असंही सतेज पाटील म्हणाले.

गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव

गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही सतेज पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी गोकुळमध्ये शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांची नावं वाचून दाखवली. या संचालकांमध्ये शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, ॲड. प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात पाटील यांचा समावेश आहे. यापैकी ॲड. प्रशांत भगवान पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारला कोल्हापूर जिल्ह्यात एक पात्र सदस्य मिळाला नाही का, असा सवालही सतेज पाटील यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul : शासननियुक्त चार संचालक कोण? गोकुळचा पडद्यामागचा खेळ सतेज पाटलांकडून संघर्ष मोर्चा सभेत उघड, राजकारणात खळबळ!

Maharashtra News Live Update: मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर पूर्णतः बंदी; महापालिका आयुक्तांचा आदेश

Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

World's Fastest Spider: माणसापेक्षा वेगाने धावणारा Spider पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT