satara 
महाराष्ट्र

युवकावर हल्ला; सदरबझारच्या महिलांनी पाेलिस ठाण्यास घेरले

पोलिसांनी संबंधितावर कारवाई करु असे सांगितल्यानंतर जमाव निघून गेला.

ओंकार कदम

सातारा : येथील सदरबझार परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मारामारीचा राग मनात धरुन न्याय हक्कासाठी सुमारे ५० नागरिकांनी सातारा शहर पाेलिस ठाण्याला घेराव घातला. ही घटना दारुविक्रीतून झाल्याची प्राथमिक मिळाली आहे. काही नागरिकांनी घरात घुसून मारहाण केल्याने परिसरातील नागरिक चिडले. यामुळे एका गटाने परिसरात हल्ला केला. या भागातील वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे सदरबझार परिसरात माेठा तणाव निर्माण झाला होता. satara illegal liquor selling citizens gathered near police station

ही घटना रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली. बेकायदेशीर मद्य विक्री करणार्‍या एका टोळक्याने धुडगूस घातल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या परिसरातील युवकास घरात घुसून मारहाण करण्यात आली. त्यानंतर काहींनी परिसरातील काही वाहने फोडली. हा दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकारा विराेधात कारवाई व्हावी यासाठी सुमारे ५० ते ६० नागरिकांनी महिलांसह शहर पोलिस ठाण्यावर जाणे पसंत केले. तेथे त्यांनी पाेलिसांसमाेर आपली कैफियत मांडली. पोलिसांनी संबंधितावर कारवाई करु असे सांगितल्यानंतर जमाव निघून गेला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात

Municipal Elections Voting Live updates : एकनाथ शिंदे सहकुटुंब मतदानासाठी दाखल

New Expressway: नाशिकला प्रदक्षिणा घालणारा रिंग रोड! तिरुपतीला अवघ्या १२ तासात पोहचणार

कुठे बोगस मतदान, कुठे मशीनमध्ये घोळ तर कुठे पैसे वाटप, म्हणे लोकशाहीचा उत्सव, राज्यात मतदानाच्या दिवशी जोरदार राडा

Homemade Facial : पार्लरला न जाता घरच्या घरीत करा हे ५ फेशियल, चेहरा दिसेल चमकदार आणि सुंदर

SCROLL FOR NEXT