Satara Pusesavali News Saamtv
महाराष्ट्र

Satara Pusesavali News: साताऱ्यातील पुसेसावळीमध्ये आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव, दोन गट भिडले; इंटरनेट सेवा बंद

Satara Pusesavali Dispute: पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Pusesavali News: सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील खटाव तालुक्यात (Khatav) असणाऱ्या पुसेसावळी (Pusesawali) शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात दगडफेक झाली. यामुळे पुसेसावळी शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री 9.30 च्या सुमारास सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा संपूर्ण प्रकार घडला. ज्यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला.

याबाबतची माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रित आणली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT