shekhar singh 
महाराष्ट्र

पुसेगाव यात्रेबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंहंचा नवा आदेश

हा आदेश यात्रेच्या मुख्य दिवशी लागू राहणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सुमारे सहा लाख भाविकांची उपस्थिती असलेल्या पुसेगाव यात्रेच्या मुख्य दिवशी निघणा-या मिरवणुकीत घाेड्यांचा समावेश नकाे असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी काढला आहे. घाेडे बिथरल्यास चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नसल्याने हा आदेश काढण्यात आला आहे.

सातारा (satara) जिल्ह्यातील पुसेगावातील श्री सेवागिरी महाराज यांची वार्षिक यात्रा (yatra) आजपासून सात जानेवारीपर्यंत संपन्न हाेणार आहे. एक जानेवारी २०२२ या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्री सेवागिरी महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची रथातून मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकीत बॅन्ड पथक, भजन-किर्तन मंडळे, घाेडे आदींचा समावेश असताे. या मिरवणुकीत सुमारे पाच ते सहा लाख भाविक सहभागी हाेतात. या मिरवणुकीत पुसेगाव भागातील घाेडे मिरवणुकीत सहभागी हाेत असतात. यावेळी घाेड्यांचे मालक हे गर्दीत घाेड्यांच्या कसरती दाखविणे, नृत्य करावयास लावणे वेळ प्रसंगी चाबकाने घाेड्यांना मारहाण करणे असे करतात.

त्यामुळे नाचणारे घाेडे बिथरल्यास ते यात्रा उधळून लावण्याची व त्यातून लाेकांची चेंगराचेंगरी हाेवून जिवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी मिरवणुकीत घाेड्यांना सहभागी हाेण्यास मनाई करण्याचा आदेश नुकताच जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी काढला आहे. हा आदेश यात्रेच्या मुख्य दिवशी लागू राहणार आहे. त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar singh) यांनी नमूद केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

Pitrupaksha 2025: पितृपक्षात सोमवारी करा हे खास उपाय, पूर्वजांचा मिळेल आशिर्वाद

SCROLL FOR NEXT