Satara PHC Doctor Ends Life Saam
महाराष्ट्र

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Satara PHC Doctor Ends Life: महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली. यात महिलेनं दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

  • मृत्यूपूर्वी डॉक्टर महिलेने हातावर सुसाईड नोट लिहिली

  • दोन पोलिसांवर महिलेनं गंभीर आरोप केले.

  • शारीरिक अन् मानसिक छळाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

साताऱ्यात उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये आयुष्य संपवलं. हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. दरम्यान, य़ाच त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.

महिला डॉक्टरने परिसरातील हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या हातावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

सुसाईड नोटमधून महिलेनं दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'माझ्या आत्महत्या कऱण्य़ामागचं कारण पोलीस निरिक्षक गोपाळ बदने आहेत. त्यांनी माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला', असं महिलेनं हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

या प्रकरणी महिला डॉक्टरच्या काकांनी महत्वाची माहिती दिली. महिलेला शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 'माझ्या पुतणीनं हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. तिच्यावर कामाचा दबाव होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी काही लोकांकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अधिकाऱ्यांचा त्रास होतोय. मी आत्महत्या करेन, असंही पुतणी म्हणायची. डीवायएसपींकडे लेखी तक्रार देऊन लक्ष दिले गेले नाही' अशी माहिती डॉक्टर महिलेच्या काकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाती निधनाला महिना पूर्ण; 30 दिवसात बदललं राज्याचं राजकारण

Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

Ajit Pawar Plane Crash: ट्रेनी विद्यार्थी चालवत होते 'एटीसी टॉवर'; अहवालातून बारामती विमानतळाबाबत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT