Satara Doctor Death 
महाराष्ट्र

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

Satara Doctor Death: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवे यांनी धक्कादायक खुलासा केलाय. पत्रात भाजपच्या माजी खासदाराचे नाव असल्याची माहिती दानवे यांनी दिलीय. दानवे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Bharat Jadhav

  • फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.

  • डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलंय.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे.

फलटणमधील महिला डॉक्टरवर दबाव टाकणारा खासदार आणि त्यांचे पीए कोण? यासंदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मात्र दानवेंनी कोणत्या माजी खासदाराचं नाव उघड केलंय आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. महिला डॉक्टरचा तक्रार अर्ज ते चौकशी समितीसमोरील खुलासा. या सगळ्या पत्रात वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या खासदार आणि त्यांच्या पीएसंदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी थेटपणे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेत त्यांच्या अटकेची मागणी केलीय.

दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र या प्रकरणी सीडीआर काढल्यास प्रकरणाचा छडा लागेल म्हणत सूचक वक्तव्य केलंय. आता आरोपांच्या घेऱ्यात सापडलेले भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. एवढंच नाही तर या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलीय.

खरं तर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने छळामुळे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली..या सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख होता.. तर चौकशी समितीसमोर केलेल्या खुलाशात खासदार आणि त्यांच्या 2 पीएचा उल्लेख समोर आलाय.. त्यात आता दानवेंनी थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: स्वेटशर्टचा कापूस सारखा निघतो? मग वापरा ही सोपी टिप

Bun Maska: इराणी कॅफे स्टाईल बन मस्का कसा बनवायचा? चहाची चव वाढेल

Maharashtra Live News Update: पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती पत्नीसह मुलाचा मृत्यू

Crime: अनैतिक संबंधासाठी बायकोचं हादरवणारं कृत्य, बॉयफ्रेंडची मदत घेतली, नवऱ्यासोबत केलं असं काही की...

Nashik Crime: ६४ वर्षीय व्यक्तीचे अश्लील चाळे, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; मालेगावनंतर मनमाड हादरलं

SCROLL FOR NEXT