Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News : धनगर आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यात बंदची हाक; बहुतांश गावात कडकडीत बंद

Satara News : लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशी करिता गेल्या बारा दिवसापासून गणेश केसकर बेमुदत उपोषणाला बसले आहेत

Rajesh Sonwane

ओंकार कदम
सातारा
: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात बेमुदत उपोषण सुरु आहे. सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. (Satara) यामुळे समाजातंफ्रे आज खंडाळा (Khandala) तालुका बंदची हाक दिली होती. खंडाळा तालुका बंदला खंडाळावासीयांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून अनेक गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीनंतर (Dhangar Reservation) धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मोर्चा, उपोषण करत एसटी प्रवर्गात समजलं आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशी करिता गेल्या बारा दिवसापासून गणेश केसकर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेत नसल्यान धनगर समाजाने  खंडाळा तालुका बंदची हाक दिली दिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावांमध्ये शुकशुकाट 

समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. आज बाराव्या दिवशीही गणेश केसकर यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. दरम्यान आज सकाळपासूनच खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे गावांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT