Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara : गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ जातात गाव सोडून; काय आहे नेमकी गावची प्रथा

Satara News : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील डोंगराच्या कुशीत असणारे गोंदेमाळ हे गाव अनोख्या प्रथेमुळे चर्चेत आले आहे. गेली अनेक पिढ्यानपिढ्या या गावामध्ये ही अनोखी प्रथा सुरू आहे

ओंकार कदम

सातारा : देशातील प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. त्या प्रथा आजच्या संगणीकरणाच्या युगात देखील कायम आहेत. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील गोंदेमाळ या गावची प्रथा काही न्यारीच आहे. दर तीन वर्षांनी गुढीपाडवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अख्खे गावच रिकामे होत असते. देवाचा नवस फेडण्यासाठी चक्क अख्खे गावच पळून जायची अनोखी प्रथा गावात आजही कायम आहे. 

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील डोंगराच्या कुशीत असणारे गोंदेमाळ हे गाव अनोख्या प्रथेमुळे चर्चेत आले आहे. गेली अनेक पिढ्यानपिढ्या या गावामध्ये ही अनोखी प्रथा सुरू आहे. या गावातील कोणतीही लोक अंधश्रद्धेला अजिबात दुजोरा देत नाही. परंतु पूर्वजांनी घालून दिलेले काही नियम अटी पाळण्यासाठी त्यांचा मान ठेवण्यासाठी आजपर्यंत या गावामध्ये गुढीपाडव्यानंतर दर तीन वर्षांनी गावातून पळ काढला जातो. गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या गुराढोरांसहित गाव सोडून निघून जातात. 

गाव सोडण्याचे काय आहे कारण 

गावातील वयस्कर मंडळी सांगतात; त्यांच्या आई- वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे काही पिढ्यांपूर्वी या गावांमध्ये वंश वाढत नव्हता.  मग देवाला नवस बोलल्यानंतर दर तीन वर्षांनी गुढीपाडव्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी गावातील मंडळी एकत्रित येऊन श्रद्धेने हे गाव सोडून निघून जातात. जेव्हा देवाचा कौल येईल तेव्हा हे गावकरी पुन्हा आपल्या गावी येतात. हा नवस फेडण्यासाठी या गावातील लोक अजूनपर्यंत ही अनोखी प्रथा पाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

घरांसह कार्यालयेही राहतात बंद 

विशेष म्हणजे या प्रथेच्या दरम्यान या गावांमध्ये अजिबात कोणाचाही वावर नसतो. गावातील घर, कार्यालय, दुकाने सर्व काही बंद असतात. परंतु आजपर्यंत या प्रथेच्या दरम्यान गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संपूर्ण गाव निर्मनुष्य असून सुद्धा गावामध्ये साधी चोरी सारखा प्रकार सुद्धा आजपर्यंत कधी घडला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या काळात शेजारीच असलेल्या म्हाते या गावामध्ये ग्रामस्थ मुक्काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT