Bribe Satara News
Bribe Satara News Saam tv
महाराष्ट्र

Bribe: अपघात विमा प्रकरण मंजुरीसाठी लाच; कृषी पर्यवेक्षक अडकला जाळ्यात

ओंकार कदम

सातारा : शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी बाकी होती. सदर प्रकरण मंजुरी करता पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना येथील तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक लाच लुचपत विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडले आहेत. (Maharashtra News)

फलटण तालुक्यातील (Satara) ४६ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या मयत पत्नीचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरीसाठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते. परंतु, सदरचे प्रकरण अनेक दिवसांपासून पडून होते. यावर निर्णय होत नसल्‍याने तक्रारदार व्‍यक्‍ती याकरीता कार्यालयात चकरा मारत होता.

दहा हजाराचा लाचेची मागणी

शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटणमधील कृषी पर्यवेक्षक बाळू निवृत्ती गावडे (वय ५२ राहणार प्लॉट नं ३ अष्टविनायक रो हाऊस सोसायटी प्रगतीनगर, बारामती) याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती लाच रक्कम स्वीकारताना बाळू ‍याला लाच लुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT