Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News : मोरेवाडी गावावरील डोंगराला भल्या मोठ्या भेगा; प्रशासनाने केले स्थलांतर

मोरेवाडी गावावरील डोंगराला भल्या मोठ्या भेगा; प्रशासनाने केले स्थलांतर

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने सातारा (Satara) तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडुन काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आले आहे. यामुळं याठिकाणच्या लोकांना (Rain) तात्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन या ठिकाणी पोहोचुन लोकांना शेल्टर मध्ये राहण्याची विनंती करतायेत. (Live Marathi News)

साताऱ्यातील मोरेवाडी गावावर सध्या भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. गावाच्या लगत असणाऱ्या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्यामुळं गावावर हे संकट काळ बनुन उभ असल्याचं पाहायला मिळतय. डोंगराला भेगा पडल्यामुळे या ठिकाणीचे भले मोठे दगड देखील अनेक फुट पुढे सरकलेत. नेहमी या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यानंतर गावात भितीचं वातावरण पसरले आहे. 

कायमचे स्थलांतराची मागणी 

मोरेवाडी गावातील २३ कुटूंब सुरक्षितस्थळी हलवण्यात आली आहेत. मात्र शेल्टरमध्ये या लोकांना हलवलं असले तरी प्रत्येक पावसाळ्यात मृत्यु आमच्या डोक्यावर काळ बनुन बसलेला असतो असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं. इर्शाळवाडी सारख्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी आमचं कायमचं पुणर्वसन करा; अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील जप्त केलेल्या ६ कोटींच्या ड्रग्सचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, गोल्फ कोर्सचा हमाल बनला 'बेनी'चा दलाल

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

Health Care Tips: जेवणापूर्वी पाणी पिण्याची सवय रक्तातील साखरेवर नेमका कसा परिणाम करते?

आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार; भाजप नेत्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT