Satara News
Satara News ओंकार कदम
महाराष्ट्र

भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याला शांततेचा सल्ला देणाऱ्यालाच मारहाण; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

ओंकार कदम

सातारा: महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील महादेव बाग हॉटेलसमोर भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या जावळीतील काही युवकांनी महाबळेश्वरच्या एका युवकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Mahabaleshwar Pachgani road )

या मारहाणीत महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) युवक जखमी झाला असून हा सर्व मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर महादेव बागसमोरील रस्त्यावर दहा ते बारा युवकांचे टोळके नाचत होते.

पाहा व्हिडीओ -

याच वेळी महाबळेश्वरचा एक युवक पाचगणीवरून महाबळेश्वरला जात असताना रस्त्यावर धिंगाणा करणारं टोळकं त्याच्या नजरेस पडलं यावेळी त्यांने धिंगाणा करणाऱ्या युवकांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र, नाचणाऱ्या टोळक्याला त्याने बाजूला व्हायला सांगितल्याचा राग आला आणि जावळीचे युवक आणि महाबळेश्वर युवक यांच्यात बाचाबाची सुरू झाली.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि या दोन्ही गटाच्या मारहाणीमध्ये महाबळेश्वरचा युवक जखमी झाला असून जावळीतून आलेल्या युवकांच्या टोळक्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT