shekhar sinh 
महाराष्ट्र

Lockdown : साता-याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर; 'आराेग्य' ला ताकीद

साम टिव्ही ब्युरो

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन काम करावे. तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून contact tracing ज्या गावात किंवा संबंधित भागात अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करावे containmnet zone अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar sinh यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयाेजिलेल्या बैठकीत आराेग्य विभागास दिल्या. दरम्यान सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत आहे तो लॉकडाउन पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील. त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी सिंह यांनी यंत्रणेस दिली आहे. (satara-lockdown-news-shekhar-sinh-karad-wai-coronavirus)

कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा आढावा घेऊन पुढील उपायोजनांसदर्भात आयोजित आरोग्यसह सर्वच विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

प्रारंभी आरोग्य विभागाने आढावा दिला. त्यादरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजातील सुधारणांबाबत सूचना केल्या. बाधितांच्या सहवासातील रुग्णांचा शोध व टेस्टिंग वाढवणे, ज्या गावात किंवा संबंधित भागात अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत त्या जागा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करा, विलगीकरण कक्ष सुरू करणे आदींबाबत त्यांनी सूचना दिल्या.

सध्या कोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कडकपणे करावी, आदेश देऊन जे कोरोना नियम व आदेश लागू केले आहेत, त्याबाबत सर्वच प्रशासकीय विभागाने त्याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यकता भासल्यास कारवाई करावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT