Maharashtra Hit And Run:  Saamtv
महाराष्ट्र

Satara Accident News: मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले, १२ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत; साताऱ्यातील संताजनक घटना

Maharashtra Hit And Run: कारचालकाने पुढे जाऊन दुचाकीवरील दोघांना उडवले असून दोघेही गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

Koregaon Hit And Run: सातारा जिल्ह्यातून हिट अँड रनची भयंकर घटना समोर आली आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे भरधाव वेगात मद्यधुंद कारचालकाने 12 वर्षीय मुलीला उडवले.या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कारचालकाने पुढे जाऊन दुचाकीवरील दोघांना उडवले असून दोघेही गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या कोलवडी गावामध्ये रस्त्याच्या बाजूने निघालेल्या 13 वर्षीय युवतीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका कारचालकाने जोरदार धडक दिली, यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतीक पवार असे कार मालकाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालकाने कार न थांबवता पुढे जाऊन दुचाकीवरील आणखी दोन जणांना उडवल्याने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत.

अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालक फरार झाला. त्यानंतर भिमनगर येथील एका शेतात संबंधित अपघातग्रस्त कार आढळून आली आहे. या प्रकरणात कोलवडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संशयित कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मुलीच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

दरम्यान, रायपुरकडन नापुरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून गोंदिया जिल्हातील देवरी पोलिसांनी रात्री शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासनी नाक्याजवळ बंदोबस्त लावत ओल्या गांज्याचे 24 प्याकेट जप्त केले आहे. ज्यामुळे परराज्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपींना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफीवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली, ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडीओ

Maharashtra Live News Update: जयंत पाटलांकडून नगराध्यक्षाचा पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Manoj Jarange : हत्येचं षडयंत्र कुणी रचलं? मनोज जरांगेंनी केला गंभीर आरोप

Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

SCROLL FOR NEXT