Satara Crime News Saamtv
महाराष्ट्र

Satara Crime News: भर चौकात महिलेवर हल्ला; लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण.. माण तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Satara Man Taluka News: या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Crime News: गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरुन महिलेला भरचौकात मारहाण केल्याची घटना साताऱ्याच्या माण तालुक्यात घडली आहे. महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माण तालुक्यातील (Man) पानवण येथे चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. भरचौकात चौघा जणांकडून महिलेवर हल्ला चढवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले.

तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणात देवदास महादेव तुपे यांनी म्हसवड (Mhaswad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. देवदास नरळे, पिंटू नरळे अशी अटक केलेल्यांची नावे असून संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

Accident News: बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू,२५ जखमी

SCROLL FOR NEXT