drown 
महाराष्ट्र

बहीण-भावाचा मृतदेह सापडला; राणे कुटुंबियावर आघात

ओंकार कदम

सातारा : शनिवारपासून बेपत्ता असलेल्या बहीण भावाचा मृतदेह तुकाईनगर (पाडेगाव) परिसरात आज (रविवार) सकाळी निरा उजव्या कालव्यात आढळला. पाेलिसांनी दाेघांचे मृतदेह युवकांच्या सहकार्यातून पाण्यातून बाहेर drown काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. वय वर्ष चार आणि अडीच वर्षाच्या बालकांचा अशा पद्धतीने झालेला मृत्यूची सविस्तर चाैकशी पाेलिस करीत आहेत.

अंदोरी (ता. खंडाळा) नजीकच्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा चार वर्षाचा मूलगा आशिष आणि अडीच वर्षाची मुलगी ऐश्वर्या हे दाेघे भाऊ बहीण शनिवारपासून बेपत्ता हाेते. त्यामुळे त्यांचे शाेध सुरु हाेता. ही दाेन्ही बालक बेपत्ता झाल्याची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने शाेधाशाेध सुरु केली परंतु शनिवारी रात्री पर्यंत बालक सापडली नाहीत.

आज (रविवार) सकाळी राणे कुटुंबियांच्या नजीक असलेल्या निरा उजव्या कालव्यात आशिषचा मृतदेह आढळला तसेच त्याची बहीण ऐश्वर्या हिचा सोळस्कर वस्तीनजीक पोलिसांना आढळला. पोलिसांनी दाेघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या बालकांचा कशामुळे मृत्यू झाला याची तपास पोलिस करीत आहेत अशी माहिती सहाय्यक पाेलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

SCROLL FOR NEXT