Satara Accident News Saamtv
महाराष्ट्र

Satara Accident: ह्रदयद्रावक! शेतावरुन घरी जाताना काळाचा घाला; ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू

Satara Tractor Accident: कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना घसरट्यामुळे ट्रॉली पलटी झाली

Gangappa Pujari

ओंकार कदम, सातारा...

Satara Karandwadi Accident News: सातारा जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सातारा शहरा जवळच्या कारंडवाडी येथे अरुंद पुलावरून जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू झाला. या अपघातात एका महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. (Satara Tractor Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा (Satara) शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला जखमी आहे.

शेतातील कामे आवरुन जनावरांचा चारा घेऊन घरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून या महिला जात होत्या. पावसामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला होता. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना घसरट्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. ज्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला..

अलका भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५),लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०) सर्व रहाणार कारंडवाडी अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT