Satara Suryachiwadi Accident:  Saamtv
महाराष्ट्र

Satara Accident News: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भीषण कार अपघातात चौघांचा मृत्यू, ५ जखमी

Satara Suryachiwadi Accident: साताऱ्याच्या सुर्याचीवाडीजवळ भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये ३ जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara Accident News: सातारा जिल्ह्याच्या सुर्याचीवाडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनाला जाताना गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Satara Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सुर्याचीवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला जात होते.

यावेळी खटाव ते मायणी सुर्याचीवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ओम्नी गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. (latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT