नितेश राणे सुपारीबाज आमदार; राणेंनी मारेकऱ्याला पाठवला फोटो- सावंत Saam TV
महाराष्ट्र

नितेश राणे सुपारीबाज आमदार; राणेंनी मारेकऱ्याला पाठवला फोटो- सावंत

संतोष परबांवर हल्ला करण्यासाठी नितेश राणेंनी सचिन सातपुतेला सांगितले होते.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारी (प्रतिनिधी)

सिंदुधुर्ग: संतोष परब हल्ल्यात (Santosh Parab) आमदार नितेश राणेंना 2 दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आमदार नितेश राणे हे आता सुपारीबाज आमदार म्हणून राज्यात ओळखले जातील अशा शब्दांत माजी जिल्हा बँक अध्यक्ष आणि नितेश राणेंचे कट्टर विरोधक सतीश सावंत (Satish Sawant) यांनी टीका केली आहे. संतोष परब हल्ल्याचा आणि पोलीस तपासाचा घटनाक्रम सतीश सावंत यांनी उलगडून सांगितला. 28 ऑगस्ट 2021 रोजी संतोष परब यांचा फोटो नितेश राणेंच्या (Nitesh Rane) व्हाट्सएपवरून संतोष परबांवर मारेकरी पाठवणाऱ्या सचिन सातपुतेंना (Sachin Satpute) पाठवला गेला.

संतोष परबांवर हल्ला करण्यासाठी नितेश राणेंनी सचिन सातपुतेला सांगितले होते. दिल्लीमधून सातपुतेला अटक केल्यानंतर सातपुतेकडून पोलीस तपासात नितेश राणेंचे नाव उघड झाले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठी सुपारी देऊन खुनी हल्ला करायला लावणारे नितेश राणे आता राज्यात सुपारीबाज आमदार म्हणून ओळखले जातील अशा शब्दांत सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला आहे.

दरम्यान नितेश राणे हे काल न्यायालयास शरण गेले हाेते. न्यायालयाने (court) राणेंना न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यावर आक्षेप घेत 10 दिवसांची पाेलिस काेठडीची मागणी केली हाेती. सरकारी वकील घरत यांनी न्यायालया समाेर जाेरदार युक्तीवाद केला. सुमारे दाेन तास झालेल्या घडामाेडीनंतर न्यायालयाने नितेश राणेंना 2 दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. परवा नितेश राणेंनी न्यायालयात हजर न राहता जामीन अर्ज केला होता त्यामुळे तो अर्ज फेटाळल्याचं वकिलांनी सांगितले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT