Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh: फरार कृष्णा आंधळे नाशकात, स्थानिकांचा दावा; पोलिसांची धावपळ

Santosh Deshmukh Beed Case: आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची माहिती तेथील काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी सहदेव नगर परिसरात धाव घेतली.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील अनेक पुरावे सीआयडीनं दाखल केलेल्या दोषारोपत्रातून समोर येत आहे. हत्याकाडांतील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, संशयित आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

कृष्णा आंधळेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. आंधळेला शोधण्यासाठी पोलिसांनी सहदेव नगर परिसरात धाव घेतली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशकात दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ दिसला असल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे.

कृष्णा आंधळे मोटारसायकलवरून एका साथीदारासोबत सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान जात होता. यादरम्यान, काही नागरीकांनी त्याला पाहिलं. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी थेट गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगर परिसर गाठले. आता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, पोलिसांकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

याआधी देखील स्थानिक नागरिकांना कृष्णा आंधळे नाशिकच्या मुक्तीधाम मंदिर परिसरात दिसला होता. त्यानंतर पोलिसांना तपास केला होता. या संपूर्ण परिसराची पाहणी पोलिसांनी केली होती. मात्र, सर्च ऑपरेशननंतर अफवा पसरली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT