Santosh Deshmukh Case  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, आणखी एक 'कराड'चं नाव, चाटेच्या जबाबातून खुलासा

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून केली. चाटे आणि केदारने आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय?

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा हळूहळू होत आहे. सीआयडी एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक धागे दोरे सापडत आहेत. आरोपी सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली असल्याचं कबुल केलं. अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून केली असल्याचे आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे सुग्रीव कराड कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी दिलेल्या जबाबातून एक नवं नाव समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली असल्याचे आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

यानंतर 'सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा अपमान झाला आहे, याचा बदला घ्यायलाच पाहिजे', असं फरार आरोपी कृष्णा आंधळेने चाटे आणि केदारला म्हटलं होतं, असं जबाबात आरोपींनी माहिती दिली. बदला घेण्यासाठी देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचंही चाटे आणि केदारने सांगितलं आहे.

सुग्रीव कराड कोण?

सुग्रीव कराड नामक हा व्यक्ती केजमधील रहिवासी आहे. जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे. सुग्रीव कराडची देशमुख हत्या प्रकरणातील भूमिका समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT