Suresh Dhas Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन; आरोपींना पोलिसांची मदत, सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas : आज आमदार सुरेश धस धाराशिवमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनीच मदत केल्याचे म्हटले. आरोपींना मदत करणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी धस यांनी केली आहे.

Yash Shirke

Santosh Deshmukh Case Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन धाराशिवशी असल्याचा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 'धाराशिवमधील पोलिसांनी, कर्मचाऱ्यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला मदत केली. त्यांच्यावरही कारवाई व्हावी' अशी मागणी धस यांनी माध्यमांसमोर केली आहे.

'वाशी पोलिसांनी, कर्मचाऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला मदत केली. अधिकारी सांगतात, आरोपी जंगलातून पळून गेले. पण ते जंगलातून नाहीत तर वाशी शहरातून पळून गेले. वाशी पोलीस ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपींना फरार व्हायला मदत केली', असे म्हणत सुरेश धस यांनी पोलिसांवर आरोप केले. 'मदत करणाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर स्वतंत्र मकोका लावावा किंवा त्यांना सहआरोपी करावे', असेही धस म्हणाले.

बीडचे आमदार सुरेश धस सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवच्या परंडा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरेश धस उपस्थित होते. तेव्हा बोलताना धस यांनी 'संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत, सत्कार स्वीकारणार नाही', असे वक्तव्य केले.

माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नाराजीवर बोलण्यास नकार दिला. जरांगे माझे दैवत आहेत, त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. तसेच कोल्हापूर येथील मराठा समाजाचे अधिवेशन हे त्या जिल्ह्यापुरते आहे. आंदोलनात मनोज जरांगे पाटलांना डावल्याचा अर्थ काढू नये असेही धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT