Dhananjay Munde Resignation Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: कडक भूमिका घ्या, आधी दिल्लीश्वरांकडून सूचना नंतर फडणवीसांचा दम; मुंडेंच्या राजीनामा घेण्यामागील कहाणी समोर

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. आपण वैद्यकीय कारणासाठी राजीमाना देत असल्याचं मुंडेंनी म्हटलं पण या राजीनाम्याची वेगळीच कहाणी समोर आलीय.

Bharat Jadhav

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अडचणीत आले. हत्या प्रकरणासंबंधीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांना आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली.

पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, अशी बाब समोर आलीय. परंतु राज्यातील प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी दिल्लीश्वरांकडून सूचना आल्यानंतर फडणवीसांनी कडक भूमिका घेत मुंडेंचा राजीमाना मागितल्याचं माहिती हाती आलीय. सरपंच हत्या प्रकरणातील देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारवर मुंडेंच्या राजीमान्याचा दबाव वाढला. त्यानंतर कडक भूमिका घेत फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीमाना मागितला.

राजीनामा द्या असे निर्देश दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पीएमार्फत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीवरून मुंडेंचा राजीनामा मंजूर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रकरणाची गांभीर्य आणि सरकारला येणाऱ्या अडचणी सर्व आमदारांना समजून सांगितल्या. परंतु धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक भूमिका घेत त्यांना दम दिला. राजीनामा देणार नसाल, तर बडतर्फीची कारवाई करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले. सोमवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले, तेव्हाही मुंडेंना फडणवीस यांनी हेच सांगितलं होतं.

दरम्यान या प्रकरणात कडक भूमिका घेण्याबाबत भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडून सूचना आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली.धनंजय मुंडे राजीनामा देणार नसतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागेल, अशीच स्पष्ट भूमिका यावेळी फडणवीस यांनी मांडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT