CID Found Valmik Karad Last Location Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा ठावठिकाणा लावण्यात CID ला यश, शेवटचं लोकेशन ट्रॅक

CID Found Valmik Karad Last Location: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या शोधात असलेल्या सीआयडीच्या हाती महत्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. सीआयडीला वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनचे अपडेट मिळाले आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगड करण्यात सीआयडीला यश येत आहे. सीआयडीच्या हाती एक एक पुरावे लागत आहेत. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मिक कराडचा सीआयडी शोध घेत आहे. अशामध्ये वाल्मिक कराडच्या शोधात असलेल्या सीआयडीच्या हाती महत्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. सीआयडीला वाल्मिक कराडचे शेवटचं लोकेशन ट्रॅक करण्यात यश आले आहे.

तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठावठिकाणा सीआयडीच्या हाती लागला आहे. फरार होण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्यात वास्तव्यास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १७ डिसेंबरला वाल्मिक कराडचे शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात होतं. पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. सीआयडीकडून कराडच्या अटकेसाठी दबाव वाढवण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्किमक कराडला अटक न केल्यामुळे बीडमधील नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरू आहे. अपहरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे.

वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने देखील ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशनांतर वाल्मिक कराडसह ४ जणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. कराडला अटक करण्यासाठी सीआयडीच्या ९ पथकाकडून शोध सुरू आहे. वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या स्कार्पिओ कारमध्ये सीआयडीला दोन मोबाईल्स फोन सापडले. या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ शूट करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीआयडीकडून सध्या याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तसंच, या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील सीआयडीने कसून चौकशी केली. बीड पोलिस ठाण्यात ही चौकशी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT