महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या भावाने घेतली अजित पवारांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली?

Santosh Deshmukh Case update : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याविषयी धनंजय देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.

Vishal Gangurde

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीडमध्ये भेट घेतली. संतोष देशमुख प्रकरणावर दोघांनी चर्चा केली. संतोष देशमुख प्रकरणावर अजित पवारांनी एक ड्राफ्ट बनवून द्यायला सांगितल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांशी भेट झाली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय देशमुख म्हणाले, 'संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आवाज उठवला. त्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केलं जात आहे. जेलमध्ये काही सुरु आहे. या सर्व विषयांवर मी अजित पवारांची भेट घेतली'.

'मला त्यांनी मागणीचा एका ड्राफ्ट बनवून द्यायला सांगितलाय. तो ड्राफ्ट मी म्हणून त्यांच्याकडे दिलाय. माझ्या मागण्या अजित पवारांनी पूर्ण केल्यानंतर मी त्यांच्या भेटीवर समाधानी होईल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

'माझे बंधू संतोष देशमुख यांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्यात येणार होतं. आम्हाला देखील माहिती मिळाली होती. ज्या महिलेकडे हे प्रकरण करण्यात येणार होते. त्या महिलेची देखील हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही सर्व माहिती मागणार आहोत. त्या संदर्भात निवेदन पोलीस अधीक्षकांना देणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी दिली आहे. त्याचबरोबर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी आज आमच्या कुटुंबांची विचारपूस केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT