sant gadge baba amravati university saam tv
महाराष्ट्र

Amravati : शिक्षकेतर कर्मचा-यांचा बेमुदत संप; अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ रद्द

काही तांत्रिक कारणांमुळे समारंभ स्थगित केल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Amravati : राज्यात अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर (maharashtra government) अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सहा मागण्या मान्य कराव्यात यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील (sant gadge baba amravati university) कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदाेलनात (aandolan) शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या आंदाेलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाचा 23 फेब्राुवारीला होणारा एकोणचाळीसावा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे समारंभ स्थगित केल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

नरेंद्र घाटोळ (कर्मचारी संघटना, सचिव) यांनी दिलेल्या माहितीनूसार अशा आहेत मागण्या

सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनरुज्जीवित करणे.

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणे.

लाभाची योजना लागू करणे.

विद्यापीठ - महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे.

सन २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.

सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्याआधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttar Pradesh : कुत्रा चावल्यामुळे मृत्यू, राज्यस्तरीय कब्बड्डीपटूने गमावला जीव | VIDEO

Nikki Tamboli Saree Photoshoot: निक्कीच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर कहर, साडीलूकवर पडल्या सर्वांच्या नजरा

Dalai Lama: दलाई लामा यांचे खरे नाव काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी

Delhi Crime News : आई अन् मुलीचा नोकराने घेतला जीव, खून करण्याचे कारण वाचून धक्का बसेल

SCROLL FOR NEXT