ऐकलतं... एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडावेळी घडलेले अनेक किस्से आणि दावे आजवर तुम्ही ऐकले असतील...मात्र मंत्री संजय शिरसाटांनी एका पॉ़डकास्टमध्ये सुरतच्या सीमेवरून परत आलेल्या एका आमदाराचं 'रामनाम सत्य' झालं असतं, असं खळबळजनक विधान केलयं...त्यामुळे शिंदेंच्या बंडावेळी सुुरतहून मागे फिरणाऱ्य़ा आमदाराची जोरदार चर्चा रंगलीय...शिरसाट
नेमकं काय म्हणाले ऐका...
दरम्यान बंडावेळी सुरतहून परतणाऱ्या आमदारांवर जर जबरदस्ती झाली असती तर काहीही घडू शकलं असतं, मात्र आम्ही त्याला जाऊ दिलं, असं स्पष्टीकरण शिरसाटांनी पुन्हा एकदा दिलाय...त्यामुळे शिरसाटांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर ठाकरेसेनेचा तो आमदार कोण? अशी चर्चा सुरू झालीय...ज्यानंतर ठाकरेसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी तो आमदार आपण असल्याचा दावा करत ...राजकारण कोणत्या थराला जात आहे हे सरकारने पाहावं, असं म्हणत शिरसाटांवर टीका केलीय...
दरम्यान याचं बंडादरम्यान आणखी काय काय घडलं होतं? यासंदर्भात धक्कादायक दावा ठाकरेसेनेच्या आमदार नितीन देशमुख यांनी केलाय... बंडानंतर सूरतहून परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांना परत येऊ दिलं नाही, असंही कैलास पाटील म्हणालेत..त्यात शिरसाटांच्या दाव्यानंतर आमदार कैलास पाटलांना "झेड प्लस"दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी ठाकरेसेनेच्या शिवसैनिकांनी केलीय... मात्र बंडातून माघार घेणाऱ्या आमदाराच्या जीवावर कोण उठलं होतं? कोणी हा मारण्याचा प्लॅन केला होता? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत. मात्र शिरसाटांच्या या विधानामुळे राजकारणाचा स्तर खालावल्याचं पुढं आलंय. पद, पैसा, प्रतिष्ठेसाठी राजकारण थेट आमदाराच्याच जीवावर उठलं होतं हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.