Sanjay Shirsat News Saam TV
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ कसा ट्विट झाला?; संजय सिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

संजय सिरसाट यांनी पत्रकारपरिषद घेऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : शिंदे गटात (Eknath Shinde) सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला. या ट्विटची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा झाली. मंत्रिपद न मिळाल्याने संजय सिरसाट हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, संजय सिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (Sanjay Shirsat Latest News)

काय म्हणाले संजय सिरसाट?

संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट केला. काही क्षणातच पुन्हा हे ट्विट डिलीट करण्यात आलं. दरम्यान, याबाबत संजय सिरसाट यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. 'मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं' असं संजय सिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरे हेआमचे कुटुंब प्रमुख होते, आता नाहीत, असंही संजय सिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं आहे. शिरसाट म्हणाले की, 'मी भावनेच्या भरात मी म्हणून गेलो की उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख होते, मी सांगू इच्छितो की हा सगळा माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मागची पोस्ट आपोआप कशी फॉरवर्ड झाली ते मला सांगता येणार नाही'. (Sanjay Shirsat News)

'आम्ही सर्व जण उद्धव ठाकरेंना सतत सांगत होतो की तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून राहा, सत्ताही इतरांच्या हातात द्या. ठरल्याप्रमाणे जर शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले अशते आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहिले असते तर शिवसेना पक्ष आणखी वाढीस लागला असता असे शिरसाट यावेळी म्हणाले'.

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून केला. यासोबत त्यांनी ठाकरेंचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही जोडला. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे आता शिंदे गटात फूट पडणार का? मंत्रिपद न मिळाल्याने संजय सिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra By-Election: राहुरीत महायुतीचा उमेदवार ठरला; महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची चर्चा?

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत

Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

SCROLL FOR NEXT