Sanjay Raut Shivsena UBT  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा उलटफेर होणार; संजय राऊतांचे संकेत, नेमका अर्थ काय?

Sanjay Raut Shivsena UBT : येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्येही फेरबदल होऊ शकतात असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

Yash Shirke

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sanjay Raut : विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अपयश मिळाले. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही आगामी निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात झाली आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पक्षात बदल होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणाले, "भूमिका काय, पक्षाचे ध्येय धोरण राहील. पक्षात नक्की बदल होणार आहे. मोह, माया, लोभ यासाठी काही लोक बाहेर जात आहेत. ते जिथं जात आहेत ती खरी शिवसेना नाही. आम्ही अशा प्रसंगातून यापूर्वीही गेलो आहोत. विधानसभेला हरलो म्हणजे आम्ही संपलो नाही. लोकशाहीत आज कटेंगे बटेंगे, एक है तो सेफ है सुरु आहे. पण यात पुढे काय होईल सांगता येत नाही."

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवरही त्यांनी टीका केली आहे. "आमचे नगरसेवक आधी सुद्धा पक्ष सोडून गेले होते. शिवसेना अस्वलासारखी आहे, १० केस गेल्याने काही फरक पडत नाही. ज्यांना जायचंय त्यांची मनधरणी आम्ही करत नाही. 'ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी जावं' असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे", असे विधान संजय राऊत यांनी केले.

आगामी निवडणुकांवर भाष्य करताना त्यांनी "राज्यात १४ महानगरपालिका आहेत. मुंबई महानगरपालिकेबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. आघाडीतून लढलं पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण मुंबईत मात्र वेगळी राहील हे त्यांनी जाहीर केले आहे" असे वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT