Sanjay Raut On Sharad Pawar 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांवर ठाकरे नाराज, संजय राऊतांनी केली जळजळीत टीका

Sanjay Raut criticism on Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे दिसतेय. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut On Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांच्यावर नाराज आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केलाय, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केली. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील दुरावा दिसून येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

एकनाथ शिंदेंना महदजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना काँग्रेसपासून दुरावली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबतही दरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं समीकरण पाहायला मिळू शकते, अशी चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवार यांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने फोडली. महाराष्ट्र कमजोर केला आशा लोकांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील.
संजय राऊत, शिवसेना(UBT), खासदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT