Sanjay Raut| Kangana Ranaut Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'कंगणाच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे, स्टेटमेंट घेऊन पार्लमेंटमध्ये चर्चा...' संजय राऊत संतापले!

Sanjay Raut On Kangana Ranaut: महायुतीचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यावर महाराष्ट्रात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले याबाबत त्यांना प्रश्न विचारला की ते लोक बनावट प्रकरण तयार करतात, असे संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २६ ऑगस्ट २०२४

दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार आणि हत्या झाल्या असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाच्या खासदार, बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत यांनी केले आहे. कंगणा रणौत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही कंगणा रणौतवर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"कंगणा रणौतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका, आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही. भारतीय जनता पक्षामधील जे लोक आहेत, त्यांना याविषयी जे करायचे आहे ते करु द्या. खरं म्हणजे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले हे जे वक्तव्य आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी कंगना रणौतचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि मग याबाबत आम्ही र्लमेंटमध्ये चर्चा करु," असे खासदार संजय राऊत म्हणाले.

आंदोलक नव्हे पगारी वर्कर..

तसेच "महायुतीचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यावर महाराष्ट्रात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले याबाबत त्यांना प्रश्न विचारला की ते लोक बनावट प्रकरण तयार करतात. आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर पगारी वर्कर आहेत. त्यांच्या सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप आहेत, एका तरुणीने आत्महत्या केली त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता पण आता तेच त्यांच्या सरकारमध्ये आहेत," असेही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

दरम्यान, "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीत आणि ते आम्हाला सांगतात की ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील, असे म्हणत पुण्यामधील अत्याचाराच्या घटनेवरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT