SANJAY RAUT'S RS 150 CRORE ALLEGATION ON DELIMITATION BILL saam tv
महाराष्ट्र

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

Delimitation Bill Row: डिलिमिटेशनसाठी सरकारकडून चाचपणी सुरु असतानाच आता राऊतांनी डिलिमिटेशनसाठी खासदारांना 150 कोटी दिले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपवर केलाय... नेमकं प्रकरण काय आहे? राऊतांनी असा गंभीर आरोप का केला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

डिलिमिटेशन विधेयकावरून आता चांगलाच वाद पेटणार आहे... आणि त्याला कारण ठरलयं...खासदार संजय राऊतांनी सरकारवर केलेले गंभीर आरोप...डिलिमिटेशन विधेयकांच्या मंजुरीसाठी खासदारांना आपल्याकडे ओढण्याकरिता 150 कोटींचा भाव लावल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय..इतकचं काय तर अमित शाह डिलिमिटेशनच्या जुळवाजुळवीसाठीच वारंवार मुंबईत येत असल्याचा संशयही राऊतांनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे संजय राऊतांच्या या 150 कोटींच्या आरोपांवर भाजपनं जोरदार पलटवार केलाय. राऊतांनी केलेले आरोप पवारांच्या पक्षालाही लागू होतात का? असा खोचक सवाल भाजपनं उपस्थित केलाय...दरम्यान, इंडिया आघाडीतील मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे भाजपप्रणित एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

संसदेत झालेल्या मतदानावेळी डीलिमिटेशन विधेयकाच्या बाजूनं एनडीएची २९८ मते तर विरोधात इंडिया आघाडीची २३० मतं पडली होती. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षफुटीनंतर तृणमूल काँग्रेसचे २० खासदार आणि ठाकरेसेनेचे ६ खासदार फुटल्यानं एनडीएचं संख्याबळ ३२४ वर पोहोचलं. आता डीलिमिटेशनला पाठिंबा देण्यासाठी डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अनुकूलता दर्शवल्याची चर्चा आहे. त्यामुळे डीएमकेचे २२ खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर एकूण संख्याबळ ३५४ इतकं होईल. मात्र, दोन तृतीयांश बहुमत गाठण्यासाठी एनडीएला आणखी ६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

आणि हेच गणित जुळवण्यासाठी मोदी सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र गेल्या वेळी संसदेत आणि रस्त्यावरील विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. आता विरोधकांचा सामना करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा डिलिमिटेशनसाठी चाचपणी करण्याचं ठरवल्याचं दिसतंय. .आणि त्यामुळेच आता यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालीय. मात्र भाजप दोन तृतीयांश बहुमत जुळवण्यात यश मिळवणार की इंडिया आघाडी आपल्या मित्रांना सोबत ठेवण्यात यशस्वी होणार याकडे लक्ष लागलंय़.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

SCROLL FOR NEXT