Sanjay Raut Slams PM Narendra Modi:  Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'मोदींजींचा कृत्रिम जलवा संपला, खोटा मुखवटा उतरला..' विधानसभेच्या निकालावरुन संजय राऊतांचा टोला

haryana Jammu Kashmir Election Results: ' कुठेही निवडणूक घ्या, भाजपचा पराभव निश्चित आहे. मोदींजींचा कृत्रिम जलवा, खोटा मुखवटा उतरला आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव निश्चित आहे,' असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut On Haryana J&K Election Results: जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पहिल्या कलामध्ये हरियाणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाने आघाडीवर असून काँग्रेसला पिछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे काश्मीरमध्ये मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला धक्का दिला आहे. मात्र भाजप- काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून अंतिम निकाल कुणाच्या बाजूने लागेल, याबाबत सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. या निकालावरुन आता संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. हरियाणात भाजप, मोदी- शहांविरोधात लाट आहे. हरियाणाची जनता भाजपला कौल देणार नाही. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. जम्मू काश्मीरमध्येही जनतेने मोदी- शहांना बाहेर काढले आहे. कुठेही निवडणूक घ्या, भाजपचा पराभव निश्चित आहे. मोदींजींचा कृत्रिम जलवा, खोटा मुखवटा उतरला आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात राहुल गांधी किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्री व्हायचं नाही. येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे साहेब. आम्हाला माहित आहे जागावाटप कसे व्हायला पाहिजे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल. काँग्रेसकडे जर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर त्यांनी जाहीर करावा. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं चेहरा असेल तर जाहीर करा आम्ही त्यांना पाठिंबा देतो लोकांमध्ये संभ्रम नको अशी शिवसेनेची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो. प्रिया दत्त निवडणूक लढणार असतील तर त्यांच्या उमेदवाराचा आम्ही स्वागत करतो आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्या यावेळी निवडणूक जिंकतील, असेही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT