Saamana Rokhthok Saam TV
महाराष्ट्र

Saamana Rokhthok: "देशाचा निवडणूक आयोग आज मोदी-शहा निवडणूक आयोग बनला"; सामना रोखठोकमधून टीकास्त्र

Saamana Rokhthok News: देशाला निवडणूक आयोग आहे काय? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या प्रचारावरून रोखठोकमधून सवाल

Ruchika Jadhav

Sanjay Raut On Election Commission:

देशात सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत प्रचारासाठी भाजपने चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळालंय. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरलेत यावरून सामना रोखठोकमधून हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग अशा शब्दांत निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात धाव

"काँग्रेसचे निवडणूक चिन्ह म्हणजे हाताचा पंजा. लखनौच्या एका मेळाव्यात मागे राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हातावर मला देव आणि संत असल्याचा भास होतो.' या विधानावर राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात व कोर्टात भाजपने धाव घेतली होती. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात.", त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

निवडणूक आयोगास मूकदर्शक बनता येणार नाही

"एक तर पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात उतरू नये व उतरले तर त्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या पक्षाने करावा. निवडणूक आयोगास (Election Commission) त्यावर मूकदर्शक बनता येणार नाही. सरकारी खर्चाने होणारा धार्मिक प्रचार, हेट स्पीच हे प्रकार आजच्या निवडणूक आयोगास खुपत नाहीत हे आश्चर्यच म्हणायला हवे.", अशी टीका खासदार संजय राऊतांनी आजच्या रोखठोकमधून केली आहे.

गर्व से कहो हम हिंदू है!

"'गर्व से कहो हम हिंदू है!' असा जोरदार नारा तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता. पराभूत प्रभाकर कुंटे यांनी नंतर मुंबई हायकोर्टात याचिका केली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याचे कोर्टाने मान्य केले व त्यांना सहा वर्षांसाठी मतदानासाठी वंचित केले.", अशी आठवण संजय राऊतांनी यावेळी करून दिली आहे.

देशाला निवडणूक आयोग आहे काय?

"निवडणूक आयोगाकडून आता स्वतंत्र, निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा का करावी?बजरंग बलीचा नारा देत भाजपास मतदान करा, असे देशाचे पंतप्रधान प्रचार सभेत सांगतात. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर तेथील जनतेस 'अयोध्यावारी'चा लाभ देऊ. तोही मोफत, असे देशाचे गृहमंत्री जाहीर करतात. देशाला निवडणूक आयोग आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो!", असा हल्लाबोल रोखठोकमधून करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

SCROLL FOR NEXT