Sanjay Raut On Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : अजित पवार आणि फडणवीसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे; संजय राऊतांची राज्यपालांकडे मागणी

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांनी आर. आर. पाटलांबाबत केलेल्या टिकेवरून संजय राऊत आक्रमक झालेत. त्यांनी अजित पवार आणि फडणवीसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी अशा शब्दांत निशाणा साधला आहे.

आबांचे केस फार लहान होते ते केसांनी गळा कापू शकत नाहीत. ते अत्यंत कर्तबगार असे राज्याचे गृहमंत्री होते. गृहमंत्री म्हणून त्यांनी कधी चुकीचं काम केलं असंही आम्हाला वाटत नाही. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेची जी शपथ घेतली आहे, त्या व्यक्तीने अशा पद्धतीने गोपनीयतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत. तुम्ही जनतेसमोर या गोष्टी कशा काय दाखवू शकता? अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

"माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर ७० कोटींचा आरोप करूया असं ठरवलं. त्यावेळी एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे गेली. त्यावर त्यांनी अजित पवारांची चौकशी करावी यासाठी सही केली. म्हणजे हेतर केसाने गळा कापण्याचे काम आहे, असं अजित पवारांनी काल एका सभेत म्हटलं होतं. तसेच पुढे अजित पवारांनी म्हटलं की, एका कार्यक्रमात त्यांना तंबाखू खाताना मी पाहिलं. त्यावेळी तंबाखू खाऊ नका असा सल्ला मी त्यांना दिला होता, असं सांगत अजित पवारांनी आरआर पाटलांची नक्कल देखील करून दाखवली होती. त्यावरून आता संजय राऊतांसह विरोधकांनी अक्रमक भूमिका घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

Alu Vadi Recipe: आज दुपारच्या जेवणासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट खमंग अळू वडी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

शेतीपुरक व्यावसायिक महिलांना 'शेतकरी दर्जा' ? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक?

एलॉन मस्क यांनी रचला इतिहास, मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर

SCROLL FOR NEXT