Sanjay Raut On Pm modi Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Pm Modi: 'बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी', बीडमध्ये राऊतांची तोफ धडाडली

'बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी', बीडमध्ये राऊतांची तोफ धडाडली

विनोद जिरे

Sanjay Raut On Pm Modi: 'नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मते मागितलीत. आमचे बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी होते आणि आहेत', असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. बीड येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

नोटबंदीवरून राऊतांची टोलेबाजी

संजय राऊत म्हणाले की, काल आपले पंतप्रधान पुन्हा प्रकटले. 2 हजारच्या नोटांची बंडल कुणाकडे असेल तर ती 50 खोक्यांचा मंत्र्यांकडे आहेत. आज गरिबांची चूल पेटेल की नाही हा प्रश्न आहे.  (Latest Marathi News)

शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंना मी अजूनही माजी मुख्यमंत्री म्हणत आहे. सुप्रीम कोर्टाने एका शब्दात सांगितलं हे सरकार घटनाबाह्य आहे. या शिंदे सरकारला लाज असती तर नैतिकतेच्या आधारावर यांनी राजीनामा दिला असता.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले, ''तुम्ही गुगलवर गेलात आणि फेकू नाव टाकलं तर मोदींचा चेहरा येतो. या फेकू सरकारचा पराभव काल कर्नाटकमध्ये झाला. नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही जिंकलात असं म्हणतात. बाळासाहेब असल्या 1 लाख मोदींना भारी होते.''

ते म्हणाले, ''आता हे 40 शिंदे गेलेत त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवावं. मी राजकारण सोडेन. या महाराष्ट्राचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. लोकांमध्ये चीड आहे. इतकी मोठी बेईमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

Maharashtra News Live Update: बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलमध्ये लागली आग

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

SCROLL FOR NEXT