Sanjay Raut yandex
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं'; संजय राऊत यांनी तिखट शब्दात डिवचलं

Sanjay Raut Criticised Raj Thackeray: 'भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळं काही धुवून निघतं. माझं राहतं घर वडिलोपार्जित जमीन ईडीने जप्त केली. एका मराठी माणसाचं राहतं घर जप्त केलं. याच भीतीमुळे प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले.'

Bhagyashree Kamble

'अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी संपत्ती रिलीज केली गेली. प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला. आता नवाब मलिक यांना मिळेल. मला तर उद्धव ठाकरे यांना सोडून सोबत येण्याची ऑफर होती. पण मी ती मान्य केली नाही. म्हणून माझं राहतं घर त्यांनी जप्त केलं.' असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी महायूती सरकारवर टीकास्त्र सोडलं. तसेच 'राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं आहे. राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवातात.' असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना तिखट शब्दात डिवचलं.

भाजप पक्ष म्हणजे वाॉशिंग मशीन

अजित पवारांवर निशाणा साधत संजय राऊत यांनी महायूती सरकारवर टीकेची तोफ डागली. '७० हजार कोटींचा घोटाळा बाहेर आलं. भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर दिलासा मिळाला. प्रफुल्ल पटेल यांची दाऊदसोबत लिंक लावलेली प्रॉपर्टी ८ दिवसात मोकळी केली. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळं काही धुवून निघतं. मला तर उद्धव ठाकरे यांना सोडून सोबत येण्याची ऑफर होती, पण मी ती मान्य केली नाही. म्हणून माझं राहतं घर वडिलोपार्जित जमीन ईडीने जप्त केली. एका मराठी माणसाचं राहतं घर जप्त केलं. याच भीतीमुळे प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले.'

राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं

'राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं आहे. राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवातात. राज ठाकरे यांच्या पक्षाने काय करावं हे आता देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत. मुंबईत मराठी बोलायची नाही अशी सक्ती केली जात आहे.' असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं.

सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका

आमच्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याबाबात आम्ही आवाज उठवला आहे. नुसतं लेक्चर देऊन उपयोग नाही. न्याय द्या.' पुढे धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका करताना, 'लेक्चर द्यायचं असेल तर जेएनयू किंवा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक व्हा' असं संजय राऊत म्हणाले.

थोडेफार मतभेद पण आम्ही संवाद साधू

'ममता बनर्जी यांचं मत आम्हाला समजलं आहे. त्या आमच्या सोबत राहाव्यात ही आमची इच्छा आहे. थोडेफार मतभेद आहेत, आम्ही कोलकात्याला जाऊन त्यांच्याशी संवाद साधू.' असं म्हणत संजय राऊत यांनी लवकरच ममता बनर्जी यांची भेट घेऊ असं स्पष्ट केलं.

शरद पवार मारकडवाडीला देणार भेट

मारकडवाडीतल्या जनतेनी महाराष्ट्राच्या लोकांना आदर्श घालून दिला आहे. तिथे आमचे आमदार निवडून आले आहेत. पण त्यांचं मत आहे की मतदान कमी झालं आहे. जेवढ्या मताने निवडून आलो त्यापेक्षा जास्त मत मिळायला हवीत. निवडणूका बॅलेट पेपरवर घ्यायला अडचण काय? असं म्हणत संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला. तसेच आज शरद पवार मारकडवाडीला जाणार आहेत. शिवाय राहूल गांधी हे देखील भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT