Sanjay Raut  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: देशात लोकशाही आहे की नाही याचा फैसला उद्या होईल - संजय राऊत

Maharashtra Political News Update: आम्ही उद्याच्या निर्णयाची वाट बघत आहोत. आम्हाला खात्री वाटतेय आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Supreme Court Verdict on Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या देशात लोकशाही आहे की नाही याचा फैसला उद्या होईल असे म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, हा देश विधानसभा आणि संसद या संविधानानुसार चालला की नाही, न्यायव्यवस्था कुणाच्या दबावाखाली काम करतंय का याचाही फैसला उद्या होईल. आम्ही उद्याच्या निर्णयाची वाट बघत आहोत. आम्हाला खात्री वाटतेय आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

नितीश कुमार उद्धव ठाकरेंना भेटणार

संजय राऊत यांनी सांगितले की, उद्या एक वाजता नितीश कुमार मातोश्रीवर येत आहेत. ते उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. याआधी मलिकार्जुन खर्गे यांनी विरोधी एकजुटीसाठी पुढाकार घेतला होता. आता उद्या नितीश कुमार येत आहेत. सत्ता परिवर्तन उत्तरेकडील राज्याकडून होते, असे संजय राऊत म्हणाले. (Latest Political News)

विधानसा अध्यक्षांवर टीका

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार विधासभा अध्यक्षांचाच आहे असे म्हटले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, जर कुणी म्हणत असेल आम्हीच तर याचा अर्थ त्यांनी काय तरी केलंय? विधानसभा अध्यक्ष विसरत आहेत की त्यांच्याप्रमाणे जाण असलेली व्यक्ती बसलेली होती. झिरवळ त्या खुर्चीवर बसले होते. हे स्वतःला कायदे पंडित म्हणत असतील तर मला कायद्याची चिंता वाटते अशी टीका राऊत यांनी नार्वेकरांवर केली. (Maharashtra Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT