Sanjay Raut Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut Arrest : सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

महाराष्ट्रातल्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut Arrest : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केलीये. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते; परंतु ते चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्याने अखेर ईडीचे पथक रविवारी सकाळी राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. १५ तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अखेर रविवारी रात्री उशिरा अटक केली. अटकेनंतर उद्या, सोमवारी सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी दुपारी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी सकाळी लवकरच ईडीचे पथक पोहोचले. त्यांनी सात ते आठ तास चौकशी केली. मात्र ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत ईडीकडून (ED) त्यांना दुपारी ताब्यात घेण्यात आले. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

ईडीच्या झाडाझडतीनंतर संजय राऊत यांनी दिली होती प्रतिक्रिया

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र! असे ट्विट करत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT