राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनं खळबळ उडालीय. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केलाय...लातूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या 25 कोटींच्या ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी शिरसाटांनी स्वतः डील केल्याचा दावा राऊतांनी केलाय. एवढंच नाही तर शिरसाटांची 27 प्रकरणं आपल्याकडे असल्यांच सांगत राऊतांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे काय आरोप केले? पाहूयात.लातूरमधील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी 25 कोटींच्या मंजुरीचा प्रस्ताव मांडला. निधीच्या मंजुरीसाठी शिरसाटांचे OSD सिद्धार्थ भंडारी यांनी मंत्री शिरसाटांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर मंत्री शिरसाटांनी थेट घरी बोलवून 5 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप राऊतांनी केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ACBनेच शिरसाटांना याची माहिती दिली.
दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या या ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी मी स्वतः शिरसाटांना 5 कोटी रुपये देतो, असा उपरोधिक टोला राऊतांनी लगावलाय.मात्र दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
राऊतांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय तर शिरसाटांनी कायदेशीर लढाईचा इशारा दिलाय. त्यामुळे येत्या काळात या '5 कोटींच्या' आरोपांवरून शिंदेसेना आणि ठाकरेसेनेतील संघर्ष आणखीनच तापणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.