Shinde warns leaders over misconduct Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: दोन्ही 'संजय'मुळे एकनाथ शिंदे सापडले चक्रव्यूहात, कडक शब्दात टोचले कान; नेमकं काय म्हणाले?

Shinde warns leaders over misconduct: संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे शिंदे गट अडचणीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचेही कान टोचले असून कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Bhagyashree Kamble

राज्याच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटातील दोन्ही (संजय) यांची चर्चा सुरूये. दोन्ही नेते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आधी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला ठोशा देऊन मारहाण केली. तर, मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडरूममध्ये बसलेले दिसत असून, बेडशेजारी पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. या प्रकरणानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली. दरम्यान, या दोन्ही प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर आलीय.

दोन्ही संजय यांच्या कारनाम्यानंतर एकनाथ शिंदे तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली. तसेच हा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही शिंदे म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शिलेदारांना कडक शब्दांत फटकारल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील तिन्ही नेत्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तिघांच्या कारनाम्यामुळे सरकरामध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना अपशब्दाचा वापर केला. नंतर त्यांचा हाणामारी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आमदार निवासातील निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी भर सभागृहात अनिल परब यांच्याविरोधात वापरलेली शिवराळ भाषा. यावेळी त्यांनी धमकी दिली. त्यानंतर मंत्री संजय शिरसाट आधी आयकर विभागाच्या नोटीशीमुळे आणि आता बेडरूममधील व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर दिसत असून, त्यांच्या बेडच्या शेजारी एक पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. या व्हिडिओमुळे संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT